विराट-अनुष्काच्या हनिमूनचा हा फोटो होतोय व्हायरल

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाहसोहळा इटलीत कुटुंब आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी आधी कसलीही कल्पना न देता थेट लग्न झाल्यानंतर सोशल मीडियावरून सर्वांना याबद्दल माहिती दिली.

त्यामुळे त्यांच्या विवाहाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. सध्या त्यांचा हनिमूनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. हा फोटो अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.

विराट आणि अनुष्का हनिमूनसाठी रोमला गेले आहेत. त्या ठिकाणावरून त्यांनी बर्फाळ जागेच्या पार्श्वभूमीवर हा फोटो काढलेला आहे असे या फोटोतून दिसून येत आहे.

अनुष्काने पोस्ट केलेल्या या फोटोला चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. त्यामुळे आता हा फोटोही काही दिवसतरी सोशल मीडियात ट्रेंडिंगला राहण्याची शक्यता आहे.

In heaven, literally 😇😍

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on