विराट अनुष्काच्या रिसेप्शनचे फोटो, व्हिडीओ वायरल

दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा काल दिल्लीत ताज पॅलेसमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला.

या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी विराट आणि अनुष्काचा पोशाख सभ्यासाची मुखर्जी यांनी डिझाईन केला होता.

विराटने काळा रेशमी कुर्ता आणि त्यावर पश्मिना शॉल घेतली होती तर अनुष्काने लाल बनारसी साडी नेसली होती. त्यांनी या रिसेप्शनमध्ये पंजाबी गाण्यांवर ठेकाही धरला होता. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

विराट आणि अनुष्का यांचा ११ डिसेंबरला इटलीत कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला होता. ही सेलिब्रिटी जोडी आता दिल्लीनंतर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. मुंबईतील या रिसेप्शनसाठी अनेक सिनेकलाकार तसेच खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

विराटने काल सोहळा पार पडल्यावर सर्वांना धन्यवाद म्हटले.