चार तासात विराट-अनुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या विवाहाला आज(11 डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याबद्दल या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडेलवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

त्याला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसादही दिला आहे. विराटने शेअर केलेल्या त्यांच्या लग्नातील फोटोला इंस्टाग्रामवर चार तासात 22 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आल्या आहेत. तसेच ट्विटरवर 68 हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि 68 हजारांपेक्षा अधिक रिट्विट आले आहेत.

त्याचबरोबर अनुष्काने त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर चार तासात 3,0लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तर ट्विटरवर 39 हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि 5 हजारांपेक्षा अधिक रिट्विट आले आहेत.

विराट आणि अनुष्काचा  लग्न सोहळा मागील वर्षी इटलीमध्ये कुटूंब आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत पार पाडला होता.

सध्या विराट भारतीय संघाबरोबर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात असून अनुष्काही त्याच्याबरोबर आॅस्ट्रेलियामध्ये आहे. ती आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठीही स्टेडीयममध्ये उपस्थित होती.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

अॅडलेड कसोटी विजयामुळे टीम इंडियाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग

दुखापतीनंतर हार्दिक पंड्या या संघाकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज