सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात 4000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे.

यासाठी विराटला 170 धावांची गरज असून अशी कामगिरी करणारा तो तिसराच भारतीय फलंदाज ठरेल. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर  (6976) आणि एमएस धोनी (4216) यांनी अशी कामगिरी केली आहे.

आतापर्यंत विराटने भारतात वनडेमध्ये खेळताना 79 सामन्यांत 76 डावांमध्ये 3830 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 14 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा नऊ फलंदाजांनीच गाठला आहे.

मायदेशात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

6976 धावा – सचिन तेंडुलकर (164 सामने)

4216 धावा – एमएस धोनी (119 सामने)

3830 धावा – विराट कोहली (79 सामने)

3415 धावा – युवराज सिंग (108 सामने)

3406 धावा – राहुल द्रविड ( 97 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी

सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीचा या विक्रमाला आहे हिटमॅन रोहित शर्माकडून धोका