- Advertisement -

आज कोहली मोडू शकतो पॉन्टिंगचा हा विक्रम

0 168

मुंबई । आजपासून भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका सुरु होत आहे. पहिला सामना आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाणार आहे.

या सामन्यात कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा ३० शतकांचा विक्रम मोडू शकतो. सध्या विराटच्या नावावर १९९ सामन्यात ३० शतके आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या या महान फलंदाजानेही ३७५ सामन्यात ३० शतके केली आहेत. जर विराटने उद्या शतक केले तर पॉन्टिंगपेक्षा तब्बल १७५ कमी सामन्यात तो या विक्रमाला गवसणी घालणार आहे.

या यादीत अव्वल स्थानी भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ४६३ सामन्यात ४९ शतके केली आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: