मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची विराटकडून बरोबरी!

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी कर्णधार म्हणून शतकी खेळी करणारा विराट हा सचिननंतरचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.

विराटने आज १५१ चेंडूत नाबाद १०३ धावांची खेळी केली तर १९९७मध्ये सचिनने कर्णधार म्हणून केपटाउनमध्ये १६९ धावांची खेळी केली होती.

२०१०मध्ये एमएस धोनी(९०) आणि १९९२मध्ये मोहम्मद अझरुद्दीन(६०)ला कर्णधार म्हणून शतकी खेळी करण्यात अपयश आले होते. या शतकी खेळीमुळे विराट पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे हे मात्र नक्की.