भारताच्या पराभवाला कर्णधार कोहलीही तितकाच जबाबदार

बर्मिंगहॅम। इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांच्या म्हणण्याप्रमाणे  कर्णधार विराट कोहलीही भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवासाठी जबाबदार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची फलंंदाजीतील कामगिरी असामान्य होती. मात्र नासिर हुसेन यांनी कोहलीच्या कर्णधार म्हणून घेतलेल्या काही निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, कोहलीनेही या पराभवाची जबाबदारी स्विकारावी असे मत व्यक्त केले आहे.

“या सामन्यातील दोन्ही डावात विराटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत चांगली फलंदाजी केली. भारत त्याच्या पहिल्या डावातील शतकाच्या जोरावरच सामन्यात पुनरागमन करु शकला.” असे नासिर हुसेन म्हणाले.

“दुसऱ्या डावात जेव्हा इंग्लंडच्या ८७ धावांवर ७ विकेट पडल्या होत्या तेव्हा आदिल रशिद आणि सॅम कुरेन खेळपट्टीवर होते. तरीही विराटने आर अश्विनला एक तास गोलंदाजी दिली नाही. त्यामुळेच भारताचे सामन्यावरील नियंत्रण सुटले. जर त्यावेळी विराटने लवकर अश्विनला गोलंदाजी दिली असती तर सॅम कुरेनला लवकर बाद करता आले असते.” नासिर हुसेन यांनी असे म्हणत विराटने या पराभवाची जबाबदारी स्विकारावी असे मत व्यक्त केले.

भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले

-टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही