२०१४ इंग्लंड दौऱ्याचे मोठे अपयश विराटने २०१८मध्ये असे भरुन काढले

भारत-इंग्लंड यांच्यात बुधवारपासून (1 ऑगस्ट) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात झाली आहे.

या मालिकेपूर्वी सर्वांकडूनच विराट कोहलीची या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत कशी कामगिरी होणार याबद्दल सर्व माजी क्रिकेटपटू, क्रिकेट विश्लेषक आणि चाहत्यांकडूनही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते.

मात्र या पहिल्या कसोटी सामन्यातच भारताच्या पहिल्या डावातच विराटने 149 धावांची खेळी करत या सर्वांच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला.

यामध्ये विराटने फक्त शतकच केले नाही तर तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत इंग्लंडला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.

विराट कोहलीचा हा इंग्लंडचा दुसराच कसोटी दौरा आहे. गेल्यावेळी भारताने 2014 साली इंग्लंडमधे कसोटी मालिका खेळली होती.

2014 च्या दौऱ्यात कोहलीची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. त्याला जेम्स अँडरलनच्या स्विंग गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले होते. त्याने पाच सामन्यांत 13.40 सरासरीने फक्त 134 धावा करता आल्या होत्या.

यामध्ये विराटला पाच कसोटी सामन्यांच्या दहा डावात विराटने फक्त 288 चेंडूंचा सामना केला होता.

मात्र विराटने एजबेस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात धडाकेबाज शतक झळकावले. यामध्ये विराटने 225 चेंडूंचा सामना केला तर दुसऱ्या डावात विराट नाबाद 43 धावा करत खेळपट्टीवर आहे. यामध्ये विराटने 76 चेंडूंचा सामना केला आहे.

म्हणजेच 2014 साली इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यात 288 चेंडूंचा सामना करणाऱ्या विराट कोहलीने 2018 च्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 301 चेंडूंचा सामना केला आहे.

तसेच या सामन्यातील शतकाबरोबर विराटने 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्याच्या कटू आठवणी पुसून काढल्या आहेत. त्याने या सामन्यात दाखवून दिले आहे की तो इंग्लंडमध्येही धावा करु शकतो.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम