किंग कोहली हा मोठा पराक्रम करण्यापासून केवळ १९ धावा दूर

पोर्ट ऑफ स्पेन। आज(11 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर होणार असून या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विश्वविक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात विराटने जर 19 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज ठरेल आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांच्या विक्रमाला मागे टाकेल.

मियाँदाद यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेमध्ये 64 सामन्यात 33.85 च्या सरासरीने 1930 धावा केल्या आहेत. तर विराटने आत्तापर्यंत वेस्ट इंडीजविरुद्ध 34 वनडे सामन्यात 70.81 च्या सरासरीने 1912 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध 2000 धावा पूर्ण करण्याचीही विराटला संधी –

विराटने या सामन्यात जर 88 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वेस्ट इंडीज विरुद्ध 2000 वनडे धावा पूर्ण करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरेल. त्याचबरोबर तो एखाद्या प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वात जलद 2000 धावा करणाराही फलंदाज ठरेल.

एखाद्या प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वात जलद 2000 वनडे धावा करण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रलिया विरुद्ध 37 सामन्यात 2000 वनडे धावांचा टप्पा पूर्ण केला होता.

#वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

1930 – जावेद मियाँदाद

1912 – विराट कोहली

1708 – मार्क वॉ

1666- जॅक कॅलिस

1624 – रमिझ राजा

#एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जलद २ हजार वनडे धावा करणारे खेळाडू- 

37 – रोहित शर्मा, ऑस्ट्रेलिया

40 – सचिन तेंडूलकर, ऑस्ट्रेलिया

44 – व्हिव्हियन रिचर्ड, ऑस्ट्रेलिया

44 – विराट कोहली, श्रीलंका

45 – एमएस धोनी, श्रीलंका

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नाही तर थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने केला हा मोठा विश्वविक्रम

रिषभ पंत, कुलदीप यादव करत आहेत अशा अनोख्या प्रकारे सराव, पहा व्हिडिओ

आज मैदानात उतरताच ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर होणार हा मोठा विक्रम