कोहलीला मोठा विक्रम करण्यासाठी दिल्ली कसोटीत २५ चेंडू खेळण्याची गरज !

दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार चेंडू खेळणारा फलंदाज बनण्यासाठी केवळ २५ चेंडू खेळण्याची गरज आहे. सध्या विराटने ३१९ सामन्यात १९,९७५ चेंडू खेळले आहेत.

विराटने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१९ सामन्यात खेळताना ५४.१०च्या सरासरीने १५९६१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केवळ दोन खेळाडूंची सरासरी ही ५० पेक्षा पुढे आहे. ज्यात विराटची सरासरी आहे ५४.११ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जो रूटची सरासरी आहे ५०.८८.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ ६ खेळाडूंनी २० हजारापेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०८१६ पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने ४६५६३ चेंडू खेळले आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेले खेळाडू
50816+ सचिन तेंडुलकर
46563 राहुल द्रविड
29486 सौरव गांगुली
22470+ मोहम्मद अझरुद्दीन
21067 व्हीव्हीएस लक्ष्मण
20384 एमएस धोनी
19975 विराट कोहली