२०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली अव्वल तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर

फोर्ब्सने 2018 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या 10 जणांमध्ये आहेत.

या यादीत कोहली 228.01 कोटी कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कॅप्टनकूल धोनी 101.08 कोटी रुपये इतक्या कमाईसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि तेंडुलकर सातव्या क्रमांकावर असून त्याची 80 कोटी रुपये एवढी 2018ची कमाई आहे.

कोहली मागील काही वर्षांपासून अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याची कामगिरीही या दोन – तीन वर्षात चांगली झाली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 354 सामन्यात 18730 धावाही केल्या आहेत. यात त्याच्या 62 शतकांचा आणि 86 अर्धशतकांचाही समावेश आहे.

तसेच त्याने यावर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौऱ्यातही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तो या कामगिरीमुळे क्रिकेटमध्ये मोठा ब्रँड बनला आहे. विराट भारतीय सेलिब्रेटींच्या यादीत जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर यावर्षी धावा करण्यासाठी झगडणारा धोनी अजूनही त्याची ब्रँडव्हल्यू टिकवून आहे. त्याला 2018 मध्ये फक्त एकच अर्धशतक करता आलेले आहे. पण तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट नंतर दुसऱ्या क्रमांरावर आहे.

धोनीनंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या 10 मध्ये सचिन तेंडुलकर (80 कोटी), पीव्ही सिंधू(36.5 कोटी), रोहित शर्मा(31.5 कोटी), हार्दिक पंड्या(28.5 कोटी), आर अश्विन(18.9 कोटी), भुवनेश्वर कुमार(17.3 कोटी) आणि सुरेश रैना(17 कोटी) यांचा समावेश आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रेटींच्या यादीत बॉलीवूड अभिनेता सलमान खान अव्वल क्रमांकावर आहे. त्याची या वर्षातील 253.25 कोटी रुपये एवढी कमाई आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने

२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन

Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला