फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत

साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही.

हा मालिकेतील चौथा सामना असुन भारतीय संघ सलग चौथ्या सामन्यात नाणेफेक हारला आहे.

विराट कोहलीचा कर्णधार म्हणुन हा ३९वा सामना आहे. यातील तब्बल २१ सामन्यात विराट नाणेफेकीत पराभूत झाला आहे तर १८ सामन्यात नाणेफेक जिंकला आहे.

विराटने ज्या १८ सामन्यात नाणेफेक जिंकली आहे त्यात १५ सामने भारतीय संघ जिंकला आहे तर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

आजचा सामना सोडून ज्या २० सामन्यात विराट नाणेफेक पराभूत झाला त्यातील ७ सामने टीम इंडिया विजयी, ७ सामने पराभूत आणि ६ सामने अनिर्णित राहिले आहेत.

विराट कोहली (कर्णधार)- 

एकुण कसोटी सामने- ३८, विजयी- २२, पराभव- ७, अनिर्णित- ९

नाणेफेक जिंकल्यावर- एकुण सामने- १८, विजयी- १५, पराभव- ३

नाणेफेक हरल्यावर-  एकुण सामने- २०, विजयी- ७, पराभव- ७, अनिर्णित- ६

महत्त्वाच्या बातम्या-

टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

चौथ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

भारत दौऱ्यासाठी विंडीज संघाची घोषणा

 पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा

भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच