विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला चौथ्या कसोटी सामन्यात एक खास पराक्रम करण्याची संधी आहे. त्याने या सामन्यात १२५ धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा करणारा तो जगातील १५वा तर भारतातील चौथा खेळाडू ठरणार आहे.

सध्या विराटच्या नावावर ३२४ सामन्यात ३७९ डावात फलंदाजी करताना ५५.६८च्या सरासरीने १७८७५ धावा आहेत. त्यात तो ५८वेळा नाबाद राहिला  असुन ५८ शतके आणि ८४ अर्धशतके केली आहेत.

२००८साली आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या कोहलीने केवळ १० वर्षांत हा कारनामा केला आहे. अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी२० मिळुन ) ९ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट सोडून कोणत्याही खेळाडूची सरासरी ५०च्या पुढे नाही. विराटने तर तब्बल ५५.६८च्या सरासरीने १८८७५ धावा जमवल्या आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केवळ सचिन तेंडूलकर (३४३५७), राहुल द्रविड (२४२०८) आणि सौरव गांगुली (१८५७५) यांनी केला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना ३० आॅगस्टपासून साउथॅंप्टनला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक

एशियन गेम्स: निरज चोप्राने भारताला मिळवून दिले भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक

एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक