फक्त आणि फक्त याच खेळाडूमूळे विराट दक्षिण आफ्रिकेत झाला यशस्वी!

मुंबई | भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली हा सध्या आयपीएल २०१८मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ४ सामन्यात २०१ धावा केल्या आहेत. तसेच सर्व आयपीएलमध्ये मिळून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

असा हा दिग्गज डिसेंबर-जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आफ्रिकेत कसोटी मालिकेत विराट प्रथमच एवढा यशस्वी ठरला होता. 

विराट एवढा यशस्वी ठरण्याचे कारण म्हणजे त्याचा बेंगलोरमधील संघ सहकारी एबी डिवीलिअर्स असल्याचे स्वत: विराटनेच सांगितले आहे. 

“मी त्या कसोटी मालिकेत काही गोष्टी एबीकडून शिकलो. त्यामूळे मी माझ्या शैलीत थोडा बदल केले. याबद्दल मी त्याला अजून काही सांगितले नाही. ” असे हा दिग्गज खेळाडू एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाला. 

विराट परवा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने १५३ सामन्यात ४६१८ धावा केल्या आहेत. तो बेंगलोरचा कर्णधार असून त्याच्याच संघात एबी सारखा दिग्गज खेळाडू आहे. 

या दोन खेळाडूंची सतत तुलना केली जाते. परंतू एबी हा माझ्यापेक्षा उजवा असल्याचे स्वत: विराटने सांगितले आहे.