सेल्फीमुळे विराट, एबी शून्य धावेवर आऊट?

झैनाब अब्बास पाकिस्तानी स्पोर्ट्स रिपोर्टर असणारी तरुणी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्याच कारणही तसंच आहे. ह्या तरुणीने विराट आणि एबी डिव्हिलिअर्स बरोबर सेल्फी काढल्यानंतर पुढच्याच सामन्यात ते शून्य धावेवर बाद झाले. हा निव्वळ योगायोग असला तरी झैनाब अब्बासला सोशल मीडियावर विशेष करून ट्विटरवर जोरदार प्रसिद्धी मिळाली.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या इंग्लंडमध्ये सुरु असून झैनाब अब्बास ही पाकिस्तानी स्पोर्ट्स रिपोर्टर सध्या त्याच्या वार्तांकनासाठी इंग्लंडमध्ये गेली आहे. तिच्या वेरिफाइड ट्विटर अकाउंटप्रमाणे ती दुनिया न्युजसाठी रिपोर्टर म्हणून काम करत असल्याच सांगितलं जात. तसेच ती पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रेसेंटर म्हणूनही काम करत असल्याचं तिची ट्विटरवरील माहिती सांगते.

झैनाब अब्बासने आफ्रिका पाकिस्तान सामन्यापूर्वी एबी डिव्हिलिअर्स बरोबर एक सेल्फी काढला. त्यानंतर हा प्रतिभावान खेळाडू त्याच सामन्यात १२ वर्षात प्रथमच गोल्डन डक(पहिल्याच चेंडूवर बाद होणे ) झाला.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी झैनाब अब्बासने विराट कोहली बरोबर सेल्फी पब्लिश केला परंतु त्या सामन्यात विराटने ८१ धावा केल्या परंतु पुढच्याच सामन्यात विराट गेल्या ३ वर्षात प्रथमच शून्य धावेवर बाद झाला.

विशेष म्हणजे ज्या सामन्यात एबी डिव्हिलिअर्स शून्यावर बाद झाला त्यात आफ्रिका पाकिस्तान संघाविरुद्ध पराभूत झाली. तर विराट शून्यावर बाद झालेल्या सामन्यात भारत श्रीलंकेकडून पराभूत झाला.

पाकिस्तानचा प्रसिद्ध स्पोर्ट्स रिपोर्टर मजहर अर्शदने यावर लगेच ट्विट करत ह्या दोघांबरोबर झैनाबने सेल्फी काढल्यामुळे ते बाद झाल्याचं बोललं. यावर तेवढच्याच उत्फुर्तपणे उत्तर देणं झैनाबने पुढचं लक्ष श्रीलंका असल्याचं सांगितलं.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना सोमवारी अर्थात १२ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे.