विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध करणार हा मोठा विक्रम !

चेन्नई । भारतीय संघाचा तिन्ही प्रकारचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेत अनेक विश्वविक्रम करणार आहे. ५ वनडे सामन्यांची ही मालिका येत्या १७ तारखेपासून चेन्नई येथील सामन्याने सुरु होणार आहे.

विराट कोहली हा आजकाल प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम करत असतो परंतु ही मालिका त्यासाठी काही खास ठरणार आहे. वनडे, कसोटी आणि टी२० अशा प्रकारात भारतात सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६व्या स्थानावर येण्यासाठी विराटला आता केवळ १३५ धावांची तर ५व्या स्थानी येण्यासाठी ३०० धावांची गरज आहे.

सध्या विराटच्या नावावर भारतात ११७ सामन्यात ६२७६ धावा आहेत. विशेष म्हणजे कॅप्टन कूल एमएस धोनीलाही भारतात ७ हजार धावा करण्यासाठी केवळ २१ धावांची गरज आहे.

भारतात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सार्वधिक धावा करणारे खेळाडू 

१४१९२ सचिन तेंडुलकर (सामने-२५८ )

९००४ राहुल द्रविड (सामने- १६७)

७७९६ वीरेंद्र सेहवाग (सामने१४५- )

६९७९ एमएस धोनी (सामने-१७६ )

६५७५ मोहम्मद अझरुद्दीन (सामने-१५९ )

६४१० सौरव गांगुली (सामने-१३० )

६२७६ विराट कोहली (सामने- ११७)

तसेच विराटला या मालिकेत आणखी एक खास विक्रम करता येणार आहे तो म्हणजे भारतात वनडे सामन्यात सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे येण्याचा. विराटने आजपर्यंत भारतात खेळलेल्या ७१ सामन्यात ५८.३९च्या सरासरीने ३५८३ धावा केल्या आहेत. विराटपुढे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड असून त्याने ९७ सामन्यात ४३.११च्या सरासरीने ३४०६ धावा केल्या आहेत.


भारतात वनडे प्रकारात  सार्वधिक धावा करणारे खेळाडू

६९७६ सचिन तेंडुलकर (सामने-१६४ )

४१५० एमएस धोनी (सामने-१११ )

३५०७ युवराज सिंग  (सामने-१११ )

३४०६ राहुल द्रविड (सामने-९७ )

३३८७ विराट कोहली (सामने- ७१)