तर विराट कोहली करू शकतो हा मोठा विक्रम

रांची । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटचा प्रकार कोणताही असो अपयश हे विराटच्या आसपासही येत नाही.

वनडे आणि कसोटी अशा दोंन्ही प्रकारात जबदस्त कामगिरी केल्यावर हा खेळाडू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतही मोठा पराक्रम करू शकतो. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २हजार धावा करण्यासाठी विराटला आता केवळ १७० धावांची गरज आहे.

सध्या त्याच्या नावावर ५० सामन्यात १८३० धावा आहेत.

विराटने या मालिकेत जर ६० धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. सध्या पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम तर दुसऱ्या स्थानावर १८८९ धावांसह तिलकरत्ने दिलशान आहे.