विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात

विशाखापट्टनम। आज(24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडेतील 37 वे शतक झळकावले आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 321 धावा केल्या.

या सामन्यात विराटने 129 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार मारताना नाबाद 157 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे. त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावा करण्याचा टप्पा पार केला आहे.

तसेच विराच हा टप्पा सर्वात जलद पूर्ण करणारा कर्णधारही ठरला आहे. त्याने कर्णधार म्हणून 137 डावांमध्ये खेळताना 8000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत.

याआधी हा विक्रम आॅस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉटींगच्या नावावर होता. पॉटींगने 187 डावांमध्ये कर्णधार म्हणूत 8000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.

याबरोबरच आत्तापर्यंत 9 क्रिकेटपटूंनी कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला आहे. या 9 जणांमध्ये विराटसह एमएस धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन हे दोन भारतीय क्रिकेटपटू आहेत.

कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे क्रिकेटपटू:

15440- रिकी पॉटींग

14878- ग्रॅमी स्मिथ

11561 – स्टीफन फ्लेमिंग

11207 – एमएस धोनी

11062 – अॅलेन बॉर्डर

8726 – अर्जूना रंणतुंगा

8410 – ब्रायन लारा

8095 – मोहम्मद अझरुद्दीन

8034 – विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या:

१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम

कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले

विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?