विराट अनुष्काने केली लग्नाची अधिकृत घोषणा

अखेर तो क्षण आला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अधिकृतरित्या विवाहबद्ध झाले. अखेर अनेक आठवड्यांच्या या अनुमानांना अखेर पूर्ण विराम मिळाला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा फ्लॉरेन्स, इटली येथे विवाहबद्ध झाले. आज सकाळी लग्नसमारंभ पार पडला. या वेळी त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. 

विराट आणि अनुष्का यांनी याबद्दल माहिती देणारे ट्वीट देखील आपल्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसिद्ध केले. लग्नाबरोबरच आता मुंबई अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला अनुष्का आणि विराटचे जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत. 

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा ट्विटरवरून केली आहे.

विराट आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” एकेमकांना वचन देत आहे की आम्ही प्रेमाच्या बंधनात आयुष्यभरासाठी आज बांधले जाणार आहोत. आम्हाला ही गोड बातमी तुम्हाला सांगताना आनंद होत आहे. हा दिवस खास आहे कारण आमच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि चाहत्यांच्या शुभेच्छा बरोबर आहेत. आमच्या ह्या प्रवासाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. ”

अनुष्कानेही असाच ट्विट करत दुसरा एक शेअर केला आहे.