विंडीज विरुद्ध तिसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, जाणून घ्या कारण

अँटिग्वा येथे सध्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर होत असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी(24 ऑगस्ट) भारतीय संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला होता.

भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी शनिवारी(24 ऑगस्ट) माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधली होती.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु होण्याआधी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारींनी सांगितले की हाताला काळी पट्टी बांधण्याचा विचार बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचा होता.

या विचाराला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या प्रशासन समीती आणि सीइओ राहुल जोहरी यांनी समर्थन दिले.

जेटली हे बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष होते. तसेच त्यांनी 1999 ते 2012 या दरम्यान दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन(डीडीसीए)चे अध्यक्षपद सांभाळले आहे.

त्यांच्या या अध्यक्षपदाच्या 13 वर्षांच्या कालावधीत दिल्लीच्या अनेक क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यामध्ये विरेंद्र सेहवाग,गौतम गंभीर, इशांत शर्मा, विराट कोहली, शिखर धवन अशा अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या क्रिकेटपटूंनी ट्विटरवरुन भावनिक ट्विट करत जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत म्हटले आहे की ‘श्री अरुण जेटलींच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते एक चांगले व्यक्ती होते. तसेच मदतीसाठी नेहमी तयार असायचे. जेव्हा 2006मध्ये माझ्या वडीलांचे निधन झाले तेव्हा ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha सा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला बुमराहने दिला होता हा सल्ला

कोहली-रहाणे जोडीने मोडला सचिन-गांगुलीच्या जोडीचा हा खास विश्वविक्रम

बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक