विराटबरोबर भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूही मुकणार बेंगलोर टेस्टला

बेंगलोर |आयपीएल संपल्यावर भारतीय संघ अफगाणिस्तानबरोबर एक कसोटी सामना खेळून इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा ८ मे रोजी होणार आहे.

भारतीय संघ बेंगलोरला १४ ते १८ जून रोजी बेंगलोर येथे कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यातून अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले.

संपुर्ण जुन महिना हा खेळाडू सरेकडून खेळणार असल्याची घोषणा झाल्यामुळे या काळात जे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत त्यातही हा खेळाडू भाग घेणार नाही.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार विराटबरोबर इशांत शर्माही अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. या काळात तो ससेक्स या काऊंटी क्लबकडून सामने खेळणार असल्यामुळे पुन्हा भारतात न येता तिकडेच थांबेल.

त्यानंतर तो एकतर इंडिया अ बरोबर सामने खेळेल किंवा भारतीय संघाबरोबर थेट कसोटी सामन्यांत भाग घेईल.

महत्त्वाच्या बातम्या –