विराट लग्नात देणार अनुष्काला ही वचने !

सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जोडीचा एक जाहिरातीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळे ‘वीरूष्का’ जोडी परत एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडीओने त्यांच्या चाहत्यांना खुश केले आहे कारणही तसेच आहे त्यांनी या व्हिडिओत एकमेकांना ते लग्नात काय वचने देतील याबद्दल सांगितले आहे.

त्यांनी ही जाहिरात मान्यवर आणि मोहेय कपड्यांच्या ब्रॅण्डची केली आहे. या जाहिरातीत असे दाखवले आहे की हे दोघे एका लग्नात गेले आहेत आणि तिथे गठबंधनाचा विधी चालू आहे.

त्यावेळी उत्सुकतेने ते एकमेकांना विचारतात की नवरा नवरी एकमेकांना काय वचने देत असतील आणि स्वतःच अंदाज लावत एकमेकांना ते स्वतः काय वचने देतील हे सांगतात.

यात विराट वचन देतो की तो महिन्यातल्या १५ दिवस जेवण बनवेल. त्यावर अनुष्का म्हणते मीसुद्धा कुठलीही तक्रार न करता ते खाईल. त्यानंतर ती म्हणते मी तुझे सगळे पासवर्ड सुरक्षित ठेवेल.

पुढे विराट वचन देतो की मी कोणत्याही शोचे सीजन फायनल तुझ्याशिवाय बघणार नाही. तिच्यासाठी स्वतःला फिट ठेवेल असे विराटने म्हटल्यावर अनुष्का त्याला म्हणते त्याची इतकी गरज नाही.

त्यानंतर मात्र विराट थोडा रोमँटिक मूडमध्ये आणि थोडा गंभीर होऊन वचन देतो की तो तिची काळजी घेईल. त्यावर ती पण म्हणते की मीसुद्धा काळजी घेईल.

असा हा अनुष्का आणि विराटचा गोड व्हिडीओ आणि त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल झालेत.