वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी म्हणुन विराटने काय केले पहाच

भारतीय संघाने सोमवारी(10 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला आहे.

त्यामुळे आता भारतीय संघ आत्मविश्वासाने 14 डिसेंबरपासून पर्थला होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अॅडलेडहून आज(11 डिसेंबर) रवाना झाला आहे.

या प्रवासादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सोबत असणारी त्याची पत्नी अनुष्का शर्माचा चांगुलपणा भारताच्या वेगवान गोलंदाजांना अनुभवायला मिळाला आहे.

त्यांनी या विमान प्रवासात वेगवान गोलंदाजांना विश्रांती घेता यावी आणि त्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून त्याचे बिजनेस क्लासचे सीट्स वेगवान गोलंदाजांना दिले आहेत.

याबद्दल इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉगन यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘विराट आणि त्याची पत्नी यांनी अॅडलेड – पर्थ या प्रवासासाठी त्यांचे बिजनेस क्लासचे सीट्स वेगवान गोलंदाजांना दिले आहेत, याचा मी साक्षीदार आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना आराम मिळेल. कर्णधार त्याच्या संघाला चांगला सांभाळत आहे.’

विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाला आज (11 डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे या खास दिवशी आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या विराटला सोबत देण्यासाठी अनुष्काही काही दिवसांपूर्वीच आॅस्ट्रेलियात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पृथ्वी शाॅच्या सहभागाबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी

चार तासात विराट-अनुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी