विराटने केला फोटो शेअर, दिवसभरात आले १७ लाख लाईक्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दक्षिण आफ्रीकेच्या दीर्घकालीन दौऱ्यानंतर तो या विश्रांतीची पूरेपूर मजा घेत आहे. या दौऱ्यात विराटने वनडे आणि टी२० मालिका जिंकून कर्णधार म्हणून एक इतिहास रचला.

या दौऱ्यावरून घरी परतलेल्या कोहलीचा मुंबई विमानतळावरील पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबतचे फोटोज् तसेच मित्राच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओही वायरल झाला आहे.

तसेच आज कोहलीने नवीन घरात काढलेला फोटो ट्विटर वरून शेअर केला आहे. हा फोटोबरोबर त्याने एक कॅप्शन जोडली, ती अशी-  “जेव्हा घरातुन एवढे आश्चर्यकारक दृश्य दिसत असेल तर दुसरीकडे जायची काय गरज…”

गेल्यावर्षी विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनी इटलीमधील टूस्कानी येथे लग्न केले. याची रीसेप्शन पार्टी मुंबई व दिल्लीत येथे आयोजित केली होती. दिल्लीत झालेल्या पार्टीत कुटूंबातील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित होते. तर मुंबईतील पार्टीत क्रिकेटमधील तसेच बॉलीवूडमधील मोठ्या तारकांनी हजेरी लावली.

कोहली बरोबरच भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंना २०१८च्या श्रीलंकेतील ‘निदहास ट्रॉफी’ या तिरंगी टी२० मालिकेतून विश्रांती दिली आहे. म्हणून नियमीत कर्णधाराच्या अनुपस्थितीत रोहीत शर्मा हा संघाचे नेतृत्व करत आहे.

या मालिकेत भारताने आत्तापर्यंत दोन सामने खेळले आहे. यातील सुरूवातीचा सामना यजमान श्रीलंकेकडून ५ विकेट्सने गमावला. तर गुरूवारी झालेल्या बांग्लादेश सोबतचा सामना ६ विकेट्सने जिंकला.