विराट-अनुष्का हे जाहिरात शूट’साठी पुन्हा एकत्र

मुंबई । भारतीय क्रिकेट रसिकांना कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील नातेसंबंधांवर वेगळं सांगायची नक्कीच गरज नाही. विराटने कधी या गोष्टीला नकारही दिला नाही.

विराट-अनुष्का हे यापूर्वी  २०१३ साली एका शाम्पूच्या जाहिरातीमध्ये सर्वप्रथम एकत्र काम केले होते. तेव्हाच त्यांच्यातील या खास नात्याची सुरुवात झाल्याची चर्चा होती. पुढे जाऊन सार्वजनिक ठिकाणी या जोडीला अनेक वेळा पाहण्यात आले. विराट कोहलीने वेळोवेळी त्याचे अनुष्काबद्दलचे प्रेम ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

ही जोडी पुन्हा एकदा आता एकत्र आली आहे ती एका कपड्यांच्या ब्रँडची खास जाहिरात करण्यासाठी. विराट कोहली हा मान्यवर या पारंपरिक कपड्यांच्या ब्रँडचा ब्रँड अँबेसेडर आहे. त्याच्याच जाहिरातीसाठी अनुष्का विराट पुन्हा एकत्र आले आहेत.

फिल्मफेर आणि विराट अनुष्का चाहत्यांनी ह्या शूटचे अनेक फोटो सोशल माध्यमांवर शेअर केले आहेत.

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर ..

विराट-अनुष्का जोडीचे अनेक चाहते आहेत. या दोघांच्या नावाने ट्विटरवर अकाउंट देखील चालवले जातात. ह्या अकाउंटवर विराट अनुष्काचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या दोघांचे चाहते त्यांना प्रेमाने वीरूष्का असे म्हणतात.