७००वर्ष जुन्या जागी झाले अनुष्का-विराटचे शुभमंगल, एका व्यक्तीचा १ आठवड्याचा खर्च १ कोटी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल इटलीतील टस्कनीमध्ये विवाह बंधनात अडकले. ही जागा शहरापासून दूर असून अतिशय शांत आहे. ही जागा थंडीच्या दिवसात बंद असते.

३ वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अनुष्काने सांगितले होते की जर ती डेस्टिनेशन वेडिंग करणार असेल तर विनयार्ड सारख्याच जागी करेल.

लग्नापूर्वी हे दोघे मिलान शहरात लग्न करणार आहे असे सांगितले जात होते. परंतु मिलानपासून ४ तासांच्या अंतरावरील शहरातच दक्षिण इटलीतील टस्कनीमध्ये त्यांनी सात फेरे घेतले.

ही एक ऐतिहासिक जागा आहे. टस्कनीपासूनही ही जागा १ तासांच्या अंतरावर आहे. येथे १३व्या शतकात ५ मोठे महाल बनवले आहेत. Borgo Finocchieto या नावाने ही जागा ओळखली जाते.

ही जागा आज जशी दिसते तशी बनवण्यासाठी तब्बल ८ वर्ष लागले. येथे २२ रूम असून त्यात जास्तीतजास्त ४४ लोक राहू शकतात. म्हणूनच अतिशय जवळच्या लोकांना येथे लग्नासाठी बोलावण्यात आले होते.

ही जागा ७००वर्ष जुनी असून येथे अतिशय गर्भश्रीमंत लोकांची डेस्ट‍िनेशन वेडिंग होतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासुद्धा आपल्या परिवारासोबत येथे सुट्ट्यांचा आनंद घ्यायला आले होते.

टस्कनीमधील हे महाल जगातील सर्वात महागड्या पहिल्या २० जागांमध्ये येतात. १ आठवड्याचा येथील एका व्यक्तीचा खर्च अंदाजे १ कोटी रुपये आहे. येथे एक रात्र थांबण्यासाठी ६ लाख ५० हजारांपासून ते १४ लाखांपर्यन्त रुपये घेतले जातात.