विराट कोहली घेणार या खेळाडूकडून वैवाहिक जीवनाच्या टिप्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. या विवाहाची बातमी या दोघांनीही सोशल मेडियावरून सर्वांना दिली.

याबद्दल या दोघांवरही विविध स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. यात अनेक खेळाडू आणि चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटीनीं सोशल मीडियाचा आधार घेत या नवविवाहित जोडीला शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्यांबद्दल विराटने आज सर्वांचे आभार मानले आहेत. अजिंक्य रहाणेचे आभार मानताना त्याने म्हटले आहे की, “धन्यवाद अजिंक्य, तुझ्याकडून काही टिप्स हव्या आहेत.”

याबरोबरच विराटने सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, शिखर धवन यांचेही आभार मानले आहे. तसेच त्याने शाहिद आफ्रिदीलाही धन्यवाद म्हटले आहे.

विराट आणि अनुष्काचा इटलीत लग्नसोहळा पार पडला होता. यासाठी त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्र परिवार उपस्थितीत होते. हे दोघे आपल्या लग्नाचे रिसेप्शन २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत देणार आहेत.