विराट कोहलीचा हा फोटो का होतोय व्हायरल?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांना चकीत करून सोडले. विराट हा क्रिकेट बरोबर इतर खेळांच्या प्रसार करण्यात देखील आघाडीवर आहे.

विराटने मागील काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या कार्यक्रमात भारतातील इतर खेळातील उभारत्या ताऱ्यांचा समावेश होता.

विराटने या कार्यक्रमात टेनिसमधील खेळाडू करमन कौर थंडी सोबत फोटो काढताना तिच्या उंचीसोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथील उपस्थित गमतीदार पद्धतीने हसत होते. विराटला सोशियल मिडीयावर त्याच्या या फोटोवरून ट्रोल केल जात आहे.

तिस्सोट कंपनीच्या नविन घड्याळाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात विराटसह सतमन सिंह, करमन कौर थंडी, आदिल बेदी, शिवानी कटारिया, सचिका कुमार इंगळे, जेहान दारुवाला, पिंकी रानी आणि मनोज कुमार हे खेळाडू उपस्थित होते.

कोहली हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात फिट खेळाडू आहे पण त्याची उंची इतर खेळाडू जसे सतमन सिंह, करमन कौर थंडी यांच्या एवढी नाही.

महत्वाच्या बातम्या-