फलंदाजीपूर्वीच विराटच्या नावावर हे पाच विक्रम

भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहली हा त्याचा ५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून त्याच्या नेतृत्वाखाली विराट श्रीलंकेत तिन्ही प्रकारात निर्भळ यश मिळवण्यासाठी इच्छूक आहे.

आज या खेळाडूने जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवले तेव्हाच अनेक विक्रम केले. त्या खास विक्रमांचा हा लेखाजोखा

१- भारताकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५० सामने खेळणारा धोनी नंतरचा केवळ दुसरा खेळाडू

२- भारताकडून ५० टी२० सामने खेळणारा ५वा खेळाडू, यापूर्वी एमएस धोनी(७८), सुरेश रैना(६५), रोहित शर्मा(६३) आणि युवराज सिंग(५८) यांनी ही कामगिरी केली.

३- विराट कोहली हा या दौऱ्यात ९ सामन्यात ५व्यांदा वेगळ्या श्रीलंकन कर्णधाराबरोबर नाणेफेकीला गेला.

४- भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा ११ वा टी२० सामना असून पहिल्यांदाच यात धोनी कर्णधार नसून विराट कर्णधार आहे.