बेंगलोरकडून खेळताना विराट कोहलीने केला हा मोठा विक्रम

मुंबई| आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही कर्णधारांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने बेंगलोरकडून खेळताना एक खास विक्रम केला. 

विराटने बेंगलोरकडून टी20 मध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम करण्यासाठी आज त्याला केवळ 49 धावांची गरज होती. या 49 धावा पूर्ण करताच तो आयपीएलमधील एकाच संघाकडून अशी कामगिरी पहिला खेळाडू ठरला.

सुरेश रैनाने चॅम्पियन्स लीग आणि आयपीएल मिळून 5400 धावा केल्या आहेत. परंतू त्यासाठी तो दोन वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. 

विराटने आजपर्यंत बेंगलोरकडून आयपीएलमध्ये 153 सामन्यात 4619 धावा केल्या आहेत, तर याच संघाकडून चॅम्पियन्स लीगमध्ये 15 सामन्यात खेळताना 14 डावात 38च्या सरासरीने 424 धावा केल्या आहेत. त्यामूळे त्याच्या बेंगलोरकडून टी20 मध्ये 168 सामन्यात 5043 धावा झाल्या आहेत.

चॅम्पियन्स लीगमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सुरेश रैना (842), मुरली विजय (497), एमएस धोनी (449) आणि विराट कोहली(424) हे सर्वोच्च धावा करणारे खेळाडू आहेत.

याचबरोबर विराट आज आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे.  हा विक्रम करताना त्याने चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकले. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 163 सामन्यात 4558 धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात मुंबईने बेंगलोरवर 46 धावांनी विजय मिळवला आहे. 

महत्वाच्या बातम्या: