विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण

आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा पूर्ण केल्या. आज त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना जेव्हा ७ धावा पूर्ण केल्या तेव्हा हा विक्रम केला.

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ३३वा खेळाडू

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा ७वा भारतीय खेळाडू, यापूर्वी सचिन, गांगुली, द्रविड, धोनी, सेहवाग आणि अझरुद्दीन यांच्याकडून ही कामगिरी

– सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये केवळ डिव्हिलिअर्स(१८९९६), गेल(१७९७२), अमला(१६५३७), धोनी(१५७४५) यांच्याकडून ही कामगिरी

-कोहलीच्या १५,०००धावांपैकी ८५८७ धावा वनडेमधून, १७६४ धावा टी२० तर ४६५८ धावा कसोटी क्रिकेटमधून आल्या आहेत .

-१५,००० धावा ५०च्या सरासरीने करणारा कोहली हा जगातील एकमेव खेळाडू. कोहलीची सरासरी ५३.४० अशी असून दुसऱ्या क्रमांकावरील कॅलिसची सरासरी ४९.१० आहे.