पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला

बेंगलोर | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार एमएस धोनीने काल आपल्या संघाला आयपीएलमध्ये एकहाती सामना जिंकून दिला. अगदी शेवटपर्यंत मैदानावर रहात त्याने षटकार खेचून विजय साकारला. 

२० षटकांत २०५ धावा करूनही कोहलीच्या संघाला ५ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. परंतू तरीही या सामन्यात त्याने एक खास विक्रम केलाच. 

कर्णधार म्हणून आपला १०० टी२० सामना खेळणारा कोहली हा काल केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याने या १०० सामन्यात ३५९१ धावा केल्या आहेत. काल ज्या सामन्यात कोहली आपला १०० वा सामना खेळला त्याच सामन्यात धोनीने  कर्णधार म्हणून ५००० धावांचा टप्पा पार केला. 

यापुर्वी एमएस धोनी (२४४) आणि गौतम गंभीर (१७०) हे भारतीय खेळाडू १०० टी२० सामने खेळले आहेत. या यादीत ९५ सामन्यांसह रोहित शर्मा चौथा आहे. 

कोहलीला कर्णधार म्हणून १०० सामन्यात संघाला ४७ विजय आणि ४८ पराभव पहावे लागले आहे तर २ सामने टाय झाले असून ३ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. 

१०० सामन्यात नेतृत्व करणारा कोहली हा जगातील ८वा कर्णधार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान