विराट कोहलीकडून जगातील सर्व दिग्गजांचा विक्रम मोडीत !

दिल्ली । आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने जगातील सर्व दिग्गजांचा विक्रम मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १६ हजार धावा करणारा विराट पहिला खेळाडू बनला आहे.

त्याने ३५० डावात ५४.२७च्या सरासरीने १६०१२ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने ३६३ डावात ही कामगिरी केली होती.

भारताचा माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून सचिनने ३७६ डावात ही कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ५ भारतीय खेळाडूंनी १६ हजार धावा केल्या आहेत. तर जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा विराट हा २६वा खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १६ हजार धावा करणारे खेळाडू
३५० डाव- विराट कोहली
३६३ डाव- हाशिम अमला

३७४ डाव- ब्रायन लारा
३७६ डाव- सचिन तेंडुलकर