किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात

सिडनी। भारताने आज (25 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आॅस्ट्रलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करत महत्त्वाचा वाटा उचलला.

विराटने या सामन्यात 41 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आत्तापर्यंत 65 सामन्यात 49.25 च्या सरासरीने 2167 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमच्या 2140 धावांना मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्याच मार्टीन गप्टीलच्या नावावर आहे. त्याने 75 सामन्यात 2271 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 90 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 2237 धावा केल्या आहेत.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय महिला आणि पुरुष खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा मिताली राजने केल्या आहेत. तिने 85 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 2283 धावा केल्या आहेत. तिच्या पाठोपाठ या यादीत रोहित आणि विराट अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पुरुष खेळाडू:

2271 – मार्टीन गप्टील (75 सामने)

2237 – रोहित शर्मा (90 सामने)

2190 – शोएब मलिक (108 सामने)

2167 – विराट कोहली (65 सामने) 

2140 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी

विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय

हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील

कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’