विराटने मोडला ब्रायन लारा यांचा विक्रम !

दिल्ली। येथे सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने द्विशतक केले आहे. हे विराटाचे ६ वे द्विशतक आहे. या द्विशतकाबरोबरच विराटने माजी वेस्ट इंडिज कर्णधार ब्रायन लारा यांचा एक खास विक्रम मोडला आहे.

विराटने ब्रायन लारा यांनी कसोटीत कर्णधार म्हणून केलेल्या ५ द्विशतकांच्या विक्रमला कर्णधार म्हणून ६ वे द्विशतक करत मागे टाकले आहे. विराट आता कसोटीत कर्णधार म्हणून केलेल्या सर्वाधिक द्विशतकांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे.

विराट या सामन्यात अजूनही नाबाद आहे. भारताने दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक पर्यंत ५ बाद ५०० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ६५ धावा करून बाद झाला आहे. तर विराट २२५ धावांवर नाबाद आहे.

कर्णधार असताना सर्वाधिक द्विशतके करणारे खेळाडू:

६- विराट कोहली
५- ब्रायन लारा
४- डॉन ब्रॅडमन
४- मायकल क्लार्क
४- ग्रॅमी स्मिथ