अखेर विराट कोहलीने मोडला एमएस धोनीचा हा मोठा विक्रम

0 217

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसरा आला आहे.

विराटने आज १४२ चेंडूत नाबाद ९६ धावांची खेळी केली तर याच मैदानावर धोनीने २०१०मध्ये ९० धावांची खेळी केली होती. तेव्हा धोनीचे शतक १० धावांनी हुकले होते.

जर विराटने आज शतकी खेळी केली तर दक्षिण आफ्रिकेत कसोटीत शतकी खेळी करणारा तो केवळ दुसरा भारतीय कर्णधार बनणार आहे. यापूर्वी १९९७मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६९ धावांची खेळी केली होती.

२०१०मध्ये एमएस धोनी(९०) आणि १९९२मध्ये मोहम्मद अझरुद्दीन(६०)ला कर्णधार म्हणून शतकी खेळी करण्यात अपयश आले होते. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता तो शतकी खेळी करेल असे वाटतेय.

Comments
Loading...
%d bloggers like this: