हा एकमेव विक्रम ‘रनमशिन’ विराट कोहलीला अशक्य…

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या क्रिकट जगतातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत अनेक क्रिकेट तज्ञांनी मांडले आहेत. तसेच विराटने शतके करत अनेक विक्रमांना गवसणी घालणे हे आता सवयीचेच झाले आहे. विराटच्या अशा अफलातून कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव नेहमीच होत असतो.

आता आॅस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉ यांनीही विराटचे कौतुक केले आहे. तसेच विराट हा महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा सर्वोच्च फलंदाजी सरासरीचा विक्रम वगळता  फलंदाजीचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असे मत स्टीव्ह वॉ यांनी व्यक्त केले आहे.

क्रिकेट आॅस्ट्रेलियाशी बोलताना वॉ म्हणाले, ‘विराटकडे जिद्द आणि धावांसाठी भूक आहे. तसेच त्याच्याकडे फिटनेस, इच्छाशक्ती, आक्रमकता आणि खेळाबद्दल प्रेम आहे. तो जोपर्यंत गंभीर दुखापतग्रस्त होत नाही, तोपर्यंत तो ब्रॅडमन यांच्या सर्वोच्च फलंदाजी सरासरीच्या विक्रमाचा अपवाद वगळता सर्व फलंदाजीतील विक्रम मोडेल.’

डॉन ब्रॅडमन यांची 99.94 अशी सर्वोच्च फलंदाजी सरासरी आहे. आत्तापर्यंत त्याच्या सरासरीच्या आसपासही कोणत्या फलंदाजाला जाता आलेले नाही. त्यांनी 52 कसोटी सामन्यात 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या आहेत.

तसेच विराटने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 351 सामन्यात 56.56 च्या सरासरीने 18665 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 62 शतके आणि 85 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटने नुकतेच विंडीज विरुद्ध पार पडलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन शतके केली होती. त्याचबरोबर त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करण्याचाही विक्रम केला आहे.

स्टीव्ह वॉ यांनी विराट बरोबरच युवा फलंदाज पृथ्वी शॉचे देखील कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार

२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर