तरच कोहली करू शकणार धोनीची बरोबरी

इंदोर । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करताना २-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून विराट प्रत्येक सामन्यागणिक अनेक विक्रम करत आहे.

तरीही असा एक खास विक्रम आहे जो करण्यासाठी इंदोर वनडेत विराटला विशेष कष्ट घ्यावे लागणार आहे. कर्णधार म्हणून धोनीने सलग ९ वनडे सामने जिंकले आहेत तर विराटने ८. धोनीने फेब्रुवारी २००८ ते जानेवारी २००९ या काळात ८ वनडे सामने जिंकले होते.

सध्या जबदस्त चांगली कामगिरी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीनेही विंडीज दौऱ्यात १, श्रीलंकेविरुद्ध ५ आणि सध्या सुरु असलेल्या मालिकेत २ असे सलग ८ सामने जिंकले आहेत. जर इंदोर येथील सामना विराट कर्णधार म्हणून जिंकला तर तो धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी करेल.

यदाकदाचित आपणास माहित नसेल तर-
विराट कोहलीने ३७ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्यात २९ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. विराटने ८०% सामन्यात भारतीय संघाला कर्णधार म्हणून विजय मिळवून दिले आहेत.विराट कोहलीने २०१३ साली प्रथम वनडे सामन्यात कर्णधार म्हणून जबादारी सांभाळली होती. २०१७ पासून विराट भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे.