दुसऱ्या वनडेतही कोहली ठरणार किंग, आरामात करणार हे ३ विक्रम आपल्या नावावर

बुधवारी( 24 आॅक्टोबर) भारत आणि विंडीजमध्ये दुसरा वनडे सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढत नवीन विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

विराटने जर या सामन्यात 81 धावा केल्या तर तो वनडेमध्ये 10 हजार धावांचा टप्पाही पूर्ण करेल त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणाराही फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे.

विराटने आत्तापर्यंत वनडेमध्ये 212 सामन्य़ात 204 डाव खेळताना 58.69 च्या सरासरीने 9919 धावा केल्या आहेत.

सचिनने वनडेमध्ये 10 हजार धावा 259 डावात पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे विराटचा फॉर्म पाहता तो तेंडुलकरचा हा विक्रम सहज मोडू शकतो अशी शक्यता आहे.

आत्तापर्यंत तेंडुलकर (18,426 धावा), सौरव गांगुली(11,363 धावा), राहुल द्रविड(10,889 धावा) आणि एमएस धोनी(10,123 धावा) या भारतीय खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे विराट 10 हजार धावा करणारा भारताचा पाचवा फलंदाज ठरेल.

विराटला मायदेशात 4000 वनडे धावा करण्याचीही संधी-

वनडेमध्ये 10 हजार धावांबरोबरच विराटला मायदेशात 4000 वनडे धावाही करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त 30 धावांची गरज आहे. आत्तापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी या दोन भारतीय खेळाडूंनी वनडेमध्ये मायदेशात 4000 धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वनडेमध्ये सचिनने 6976 धावा तर धोनीने 4216 धावा मायदेशात केल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत जगातील फक्त 9 फलंदाजांनी मायदेशात 4000 वनडे धावांचा टप्पा गाठला आहे.

2018 या वर्षात वनडेत 1000 धावा करण्याची विराटला संधी-

विराटने 2018 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 10 सामन्यात 127 च्या सरासरीने 889 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने जर 111 धावा केल्या तर तो 2018 या वर्षात वनडेमध्ये 1000 धावांचा टप्पाही पार करेल.

यावर्षी याआधी वनडेमध्ये जॉनी बेअरस्टोने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट

विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?

८० वर्षांचा धोनी व्हिलचेअरवर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळव