तो महान खेळाडू म्हणतो, विराट वनडेतील सर्वात महान खेळाडू ठरणार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जेव्हाही मैदानात उतरतो त्यावेळी बऱ्याचदा काही तरी विक्रम करत असतो. त्यामुळे आता त्याची तुलना जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंशी केली जात आहे. काही क्रिकेट जाणकरांनी त्याची तुलना सर विवियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे.

पण ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने विराट हा सर विवियन रिचर्डसनपेक्षाही वनडे क्रिकेटमध्ये सरस असल्याचे म्हटले आहे.

इंडिया टिव्हीशी बोलताना वॉर्न म्हणाला, ‘विराट हा प्रतिभावान खेळाडू आहे. आपल्या सर्वांना माहित आहे डॉन ब्रॅडमन हे सार्वकालिन महान फलंदाज होते. त्यामुळे पुढिल पिढीमध्ये कोण सर्वोत्तम आहे हे विवादात्मक होते. माझ्यासाठी विव रिचर्ड्स हे मी पाहिलेले सर्वोत्तम फलंदाज आहेत. मला वाटत नाही की मी विव रिचर्ड्सपेक्षा सर्वोत्तम कोणाला पाहिले आहे.’

‘मी विराटला त्याने सुरुवात केली तेव्हा गोलंदाजी केली आहे. मला माहित नाही की मी त्याला बाद केले की नाही. पण माझ्यादृष्टीने विराट सध्याच्या घडीला आतापर्यंतचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूसाठी विव रिचर्ड्स यांना आव्हान देत आहे.’

‘विव हे अविश्वसनिय आहेत, पण विराटचे विक्रम विशेषत: धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मला वाटते त्याने वनडेमध्ये 24 ते 25 शतके धावांचा पाठलाग करतानाच केली आहेत आणि त्यातील बरेचसे सामने जिंकले आहेत. यामध्ये तो रिचर्ड्स यांना सरस आहे.’

‘विराट हा अफलातून खेळाडू आहे. त्याला गोलंदाजी करणे अवघड आहे. मला तो ज्याप्रकारे त्याचा खेळ खेळतो ते आवडते. विराट हा कोणत्याही प्रकारात धोकादायक बनत चालला आहे विशेष करुन वनडे क्रिकेटमध्ये.’

याबरोबरच वॉर्नने त्याच्या कारकिर्दी विषयी बोलताना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना गोलंदाजी करणे कठिण असल्याचे मत त्यांने व्यक्त केले.

वॉर्न म्हणाला, ‘सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करणे माझ्यासाठी सर्वात कठिण होते. ते सर्वात कठिण फलंदाज होते ज्यांच्याविरुद्ध मी गोलंदाजी केली.’

वॉर्नने सचिनला एकूण चार वेळा बाद केले आहे. त्यातील तीन वेळा कसोटीमध्ये तर एकदा वनडेमध्ये बाद केले आहे. तसेच वॉर्नने लाराला सात वेळा कसोटीमध्ये आणि तीनवेळा वनडेमध्ये बाद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टन कूल धोनी विरुद्ध किंग कोहली सज्ज

जाणून घ्या १४२ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास