सुनिल गावसकरांनी उघड केले विराटच्या यशाचे गुपीत

भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका अत्यंत प्रतिष्ठेचा विषय ठरला होता.

मात्र इंग्लंड विरुद्धच्या एजबस्टन येथील पहिल्या कसोटी सामन्याततील दोन्ही डावात विराटने संयमी खेळी करत मोठी धावसंख्या उभारली होती.

त्याने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाला सावरत १४९ धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

विराटची ही कामगिरी भारताच्या विजयासाठी पुरेशी ठरली नसली तरी यातून त्याने सिद्ध केले की तो जगभरात कोणत्याही मैदानावर धावा करु शकतो.

विराट कोहलीच्या या यशाचे श्रेय माजी महान फलंदाज सुनिल गावसकरांनी खुद्द विराटला देत त्याची जिद्द आणि लढाऊ वृत्तीचे कौतूक केले आहे.

“मला २०१४ सालचा विराट आणि आताचा विराट यामध्ये खूप फरक जाणवतोय. २०१४ सालच्या इंग्लंडमधील अपयशानंतर विराटने त्याच्या फलंदाजीतील प्रत्येक उणीव दूर केली आहे. त्याचबरोबर फुटवर्क आणि फलंदाजी करताना लागणार संयम याचा त्याने योग्य संगम साधला आहे. त्यामुळेच त्याला पहिल्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करता आली आहे.”

“तसेच विराट यावेळी त्याच्या बॅटचा फटका मारताना वेग कमी गेल्याने त्याचा फटका अचूक बसतो. तसेच त्याला फटका खेळण्यासाठी थोडासा वेळही मिळतो. त्याने त्याच्या फलंदाजीती या महत्वाच्या बदलामुळे एजबस्टनमधील पहिल्या कसोटीत धावा करण्यात यश मिळवले आहे.” असे गावसकर इंग्लंडमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

-प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय