जेव्हा श्रीलंकन फॅन्स काढतात कोहली बरोबर ‘सरप्राईज सेल्फी’

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाली असून सध्या संघ सरावात व्यस्त आहे. आज संघातील चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली सरावासाठी जात असताना काही श्रीलंकन चाहत्यांना सुखद धक्का बसला.

हे दोनही दिग्गज खेळाडू सरावासाठी मैदानावर जात असताना श्रीलंकेमधील चाहत्यांना त्यांना पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. याची एक खास व्हिडीओ बीसीसीआयने अधिकुत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे .

विडिओमध्ये विराट आणि पुजारा कोलंबोमधील मैदानावर जात असताना समोर असलेली दोन लहान मुलं अचानक दोघांना पाहून अवाक झालेली दिसतात. त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव हे बघण्यासारखे होते. पुढे ते रस्ता पार करत असताना बाजूच्या दोन चाहत्यांनी लगेचच मोबाईल काडून सेल्फी घेतले, ते सुद्धा पक्की सुरक्षितता असताना. खूप कमी लोकं असतात ज्यांना खेळाडूंबरोबर काही मनात नसतानाही भेटता किंवा फोटो काढता येतात.

विराट कोहलीसारख्या खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी कित्येक चाहते काय काय प्रयत्न करत असतात. त्यांना जेव्हा सुरक्षा रक्षक किंवा स्वतः खेळाडू परवानगी देतो तेव्हाच छायाचित्र घेता येते.

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात ३ कसोटी,५ एकदिवसीय सामने आणि एक टी -२० सामना खेळणार आहे.

-उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स)