आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने खेळले २०,००० चेंडू, अशी कामगिरी करणारा ७वा भारतीय !

दिल्ली । भारतीय कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार चेंडू खेळणारा फलंदाज बनला आहे. यासाठी विराटला २५ चेंडू आज खेळण्याची गरज होती. विराट सध्या ८२ चेंडूत ७७ धावांवर नाबाद खेळत असल्यामुळे हा विक्रम आज विराटच्या नावे झाला आहे. सध्या विराटने ३२० सामन्यात २०,०५० चेंडू खेळले आहेत.

विराटने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२० सामन्यात खेळताना ५४.३० च्या सरासरीने १६ हजारपेक्षाजास्त धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केवळ दोन खेळाडूंची सरासरी ही ५० पेक्षा पुढे आहे. ज्यात विराटची सरासरी आहे ५४.३० तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जो रूटची सरासरी आहे ५०.८८.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून केवळ ६ खेळाडूंनी २० हजारापेक्षा जास्त चेंडू खेळले होते. त्यामुळे विराट हा आता अशी कामगिरी करणारा ७वा भारतीय खेळाडू बनला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०८१६ पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड असून त्याने ४६५६३ चेंडू खेळले आहेत.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेले खेळाडू
50816+ सचिन तेंडुलकर
46563 राहुल द्रविड
29486 सौरव गांगुली
22470+ मोहम्मद अझरुद्दीन
21067 व्हीव्हीएस लक्ष्मण
20384 एमएस धोनी
20050 विराट कोहली