त्या गोष्टीसाठी एकही रुपया न घेणाऱ्या विराटच पाकिस्तानात होतंय कौतुक!

लाहोर । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पाकिस्तानमध्ये कौतुकाचा विषय झाला आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तानचे दिग्गज कर्णधार अलीम दार यांनी सुरु केलेलं रेस्तराँ (हॉटेल).

अलीम दार यांनी पाकिस्तानमधील लाहोर शहरात एक रेस्तराँ (हॉटेल) सुरु केलं आहे. याबद्दल विराटने सोशल मीडियावरून दार यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“अलीम भाई, ऐकलं आहे की तुम्ही नवीन रेस्तराँ (हॉटेल) सुरु केलं आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमचं हे रेस्तराँ (हॉटेल) तुमच्या पंच म्हणून यशस्वी ठरलेल्या कारकिर्दीप्रमाणेच यशस्वी ठरेल. ” असे विराटने युट्युब संदेशात म्हटले आहे.

“मी असंही ऐकलं आहे की तुम्ही या रेस्तराँ (हॉटेल)मधून मिळणाऱ्या पैशांतून बहिऱ्या मुलांसाठी शाळा सुरु करणार आहात. तुमची ही इच्छाही पूर्ण होईल. मी सर्वांना विनंती करतो की या हॉटेलमध्ये जाऊन आपण येथील अन्नाचा एकदा अवश्य आनंद घ्यावा. ” विराट पुढे अलीम दार यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुकही करतो.

याबद्दल पाकिस्तानचा लाडका क्रीडा पत्रकार मजहर अर्शदने खास ट्विटकरून विराटचे कौतुक केले आहे. ” विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टपासून ५ लाख डॉलर कमवतो परंतु अलीम दार यांच्याकडून त्याने एकही रुपया घेतला नाही. “

यामुळे सोशल माध्यमांवर विराटचे मात्र पाकिस्तानमध्ये चांगलंच कौतुक होत आहे.