विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडेतील विराट कोहलीचा हा व्हि़डिओ होतोय व्हायरल

गयाना। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील काल(8 ऑगस्ट) पावसामुळे रद्द झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली डान्स करताना दिसून आला आहे. त्याच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याबरोबर भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधव आणि श्रेयस अय्यरही डान्स करताना दिसले आहेत.

याबरोबरच विराटने विंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलबरोबरही डान्सच्या काही स्टेप्स केल्या आहेत. याचा फोटो बीसीसीआयने पोस्ट केला आहे.

हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 13 षटकांचाच खेळ होऊ शकला. तसेच 13 षटकानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पावसामुळे प्रत्येकी 34 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात विंडीजने 13 षटकात 1 बाद 54 धावा केल्या होत्या. यामध्ये एव्हिन लुइसने नाबाद 40 धावा केल्या होत्या. तसेच गेल 4 धावा करुन बाद झाला. त्याला कुलदीपने बाद केले. पण या सामन्यात 13 षटकानंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला एकवेळ नडलेला क्रिकेटपटू आता होणार प्रशिक्षक!

विलियम्सनने चालू सामन्यात चाहत्यांबरोबर असा साजरा केला वाढदिवस, पहा व्हिडिओ

…म्हणून युवराज सिंगच्या संघाने दिला बसमध्ये चढण्यास नकार