आणि कुंबळेच स्वागत करणारे ट्विट कोहलीकडून डिलीट

भारतीय कर्णधार विराट कोहलीने गेल्या वर्षी जून २३ रोजी अनिल कुंबळे प्रशिक्षक झाला म्हणून केलेलं ट्विट आता डिलीट केले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून गेल्या वर्षी २३ जूनला कोहलीने कुंबळे बद्दल भरभरून लिहिलं होत.

क्रिकेट सल्लगार समितीने गेल्या वर्षी भारताचा प्रशिक्षक म्हणून भारताचाच माजी फिरकीपटू आणि महान गोलंदाज अनिल कुंबळेची निवड केली होती.

गेल्या वर्षी जेव्हा कुंबळेची निवड भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून झाली तेव्हा विराटने कुंबळेच स्वागत करताना कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या चांगल्या भविष्याची अपेक्षाही व्यक्त केली होती.

काय होत त्या ट्विटमध्ये:
“Heartiest welcome to @anilkumble1074 Sir. Look forward to your tenure with us. Great things in store for Indian Cricket with you ?”