विराटने डिजाईन केलेल्या शूजची अशी आहे किमंत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्या फॅशनमुळे चर्चेत असतो. आजही (18 आॅक्टोबर) त्याने सुप्रसिद्ध पुमा ब्रॅन्डसह स्वत: डिजाईन केलेले स्नीकर शुज लॉन्च केला आहे.

याबद्दल त्याने सोशल मिडियावरुन याची माहिती दिली आहे. त्याने यात म्हटले आहे की ‘मी आज बास्केट क्लासिक वन8 लॉन्च करत आहे. हे पहिलेच स्नीकर आहेत ज्याला मी डिजाईन केले आहे. ते साधे, थोडेसे क्रिकेटचे मिश्रण असणारे आणि कोणत्याही प्रसंगासाठी परिपूर्ण आहेत.’

विराट या शूजच्या तयारीच्या पूर्ण प्रक्रियेवेळी पुमाशी संपर्कात होता. या शूजवर क्रिकेटच्या चेंडूवर असलेल्या टाक्याप्रमाणे सोनेरी रंगाचे टाकेही घालण्यात आले आहेत.

विराटने डिजाईन केलेल्या या शूजची किंमत 5,999 रुपये आहे, असे सांगितले आहे. हे शूज विक्रीसाठी पुमाच्या स्टोअर्समध्ये आणि puma.com वर उपलब्ध असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?

वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!