कोहली आणि फुटसाल लीगचे ब्रेकअप

भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रीमियर फुटसाल लीग बरोबरचे नाते संपवावे लागणार आहे. विराट प्रीमियर फुटसाल स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आहे. ही स्पर्धा शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.

विराट इंडियन सुपर लीगमधील गोवा संघाचा सह संघमालक आहे. त्यामुळे त्याचे फुटसाल स्पर्धेशी असणारा संबंध ऑल इंडीया फुटबॉल फेडेरेशन आणि आयएसएल यांना मान्य नव्हता. त्यामुळे विराट या स्पर्धेशी नाते तोडणार आहे. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी विराटच्या प्रीमियर फुटसाल स्पर्धेशी असलेल्या संबंधावर टिपण्णी केली होती, असे मुंबई मिररचे मत आहे.

प्रीमियर फुटसाल हे शहरावर आधारीत फुटबॉल स्पर्धा आहे. भारतातील काही महानगराचे संघ या स्पर्धेत खेळतात. या स्पर्धेत सध्या सहा संघ आहेत. जागतीक पातळीवरील खूप मोठी नावे या स्पर्धेशी जोडली गेलेली आहेत.

# या स्पर्धेतील या वर्षातील संघ आणि त्यांचे मुख्य खेळाडू-

१ मुंबई वॉरियर्स- रायन गिग्स
२ दिल्ली ड्रॅगन्स – रोनाल्डिन्हो
३ बेंगलुरु रॉयल्स- पॉल शोल्स
४ केरला कोब्राज -मायकल सलगाडो
५ तेलगू टायगर्स- डेको
६ चेन्नई सिंघम – फाल्को

यदाकदाचित जर आपणास हे माहिती नसेल तर –

#१ प्रीमियर फुटसाल ही संकल्पना पोर्तुगीजचे महान फुटबॉलपटू फिगो यांची आहे.

#२ हे फुटसाल स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.

#३ इनडोर खेळली जाणाऱ्या स्पर्धेत एका संघात पाच खेळाडू असतात.

#४ पहिल्या सत्राचे मुंबई ५ हे विजेते आहेत. ते या वर्षी मुंबई वॉरियर्स या नावाने खेळत आहेत. तर बाकीच्या संघाच्या नावात देखील थोडे बदल झाले आहेत.

#५ या स्पर्धेचा अंतिम सामना दुबईमध्ये खेळण्याचे प्रयोजन आहे.

#६ ही स्पर्धा तीन आठवडे चालणार आहे.

#७ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनने देखील या लीगमधील केरला कोब्राज संघ विकत घेतला आहे.