जाणून घ्या कोण काय म्हणाले टीम इंडिया’बद्दल

कोलंबो | येथे झालेल्या श्रीलंका विरुद्ध भारत वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने श्रीलंकेचा पराभव करून श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत करणारा पहिला संघ बनला आहे. शेवटच्या सामन्याचा मानकरी भुवनेश्वर कुमार ठरला. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदा ५ विकेट्स घेतल्या. तर मालिकेत १५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमरा मालिकावीर ठरला.

या मालिकेत भारताने अनेक विक्रम केले आणि त्यामुळे जगभरातून भारतीय संघाला अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. त्यात सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, इशांत शर्मा, हर्षा भोगले यांचा समावेश आहे.