विराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी

निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.

या सामन्यात सामनावीर ठरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता विराट कोहली संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. काल विराटने एकदिवसीय सामन्यातील कारकिर्दीतील २८वे शतक झळकावले.

श्रीलंकेचा महान अष्टपैलू सनथ जयसूर्याने ४४५ सामन्यांत २८ शतके केली आहे तर हीच कामगिरी करायला भारतीय कर्णधाराला १८९ सामने लागले आहे. हे सामने जयसूर्या पेक्षा २५६ने कमी आहेत.

या यादीत कोहलीच्या पुढे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दोन खेळाडू आहेत. पॉन्टिंगच्या नावावर ३७५ सामन्यात ३० शतके तर सचिनच्या नावावर ४६३ सामन्यात ४९ शतके आहेत.

भारत ऑगस्ट महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत असून विराट कोहलीला पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

एकदिवसीय सामन्यात सार्वधिक शतके करणारे खेळाडू
४९ सचिन तेंडुलकर, सामने- ४६३
३० रिकी पॉन्टिंग, सामने- ३७५
२८ विराट कोहली, सामने- १८९
२८ सनथ जयसूर्या, समाने- ४४५
२५ हाशिम अमला, सामने- १५६

PC: espncricinfo.com